ईएसजीच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र तालक नियुक्त

0
128

गोवा मनोरंजन सोसायटीच्या (ईएसजी) उपाध्यक्षपदी सरकारने कोकणी-मराठी चित्रपट दिग्दर्शक राजेंद्र तालक यांची काल नियुक्ती केली.

दामू नाईक यांनी वरील पदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते. विधानसभा निवडणुका जवळ आल्याच्या पार्श्‍वभूमीवर आपणाला आपल्या ङ्गातोर्डा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करायचे आहे असे सांगून दामू नाईक यांनी वरील पदाचा राजीनामा दिला होता.
दरम्यान, गोवा मनोरंजन सोसायटीच्या उपाध्यक्ष म्हणून सर्वोत्तम कामगिरी करणार असल्याचे तालक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना सांगितले. इफ्ङ्गीच्या तयारीचा आढावा घेण्यास आपण प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गोवा मनोरंजन सोसायटीचा कारभार हा सदैव पारदर्शक राहिलेला आहे व यापुढेही तो तसाच राहील, असेही तालक यांनी म्हटले आहे.
तालकांच्या नियुक्तीस हरकत
दरम्यान, ङ्गेडरेशन ऑङ्ग ङ्गिल्म ङ्ग्रॅटरनिटी ऑङ्ग गोवा या संघटनेने राजेंद्र तालक यांच्या नियुक्तीला जोरदार हरकत घेतली आहे. ईएसजीचे सर्वसाधारण मंडळ मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बरखास्त करावे व नव्या सर्वसाधारण मंडळाची स्थापना करावी अशी मागणीही वरील संघटनेने केली आहे. वरील संघटनेचे उपाध्यक्ष व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मीकांत शेटगावकर यांनी त्यासंबंधी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पत्र लिहिले आहे.