इलेक्ट्रिक वाहनांसाठी पुन्हा अनुदान योजना

0
41

राज्य सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा खात्याकडून इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान योजना पुन्हा जाहीर केली आहे. ही अनुदान योजना 1 ऑगस्ट 2022 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीसाठी लागू राहील.
या योजनेखाली दुचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी 8 ते 15 हजार रुपये, तीनचाकी वाहन खरेदीसाठी 8 ते 60 हजार रुपये आणि चारचाकी वाहन खरेदीसाठी 8 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

राज्य सरकारने पहिल्यांदा ही योजना डिसेंबर 2021 मध्ये जाहीर केली होती. या योजनेतून अनेकांना इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी अनुदान दिलेले आहे. त्यानंतर 31 जुलै 2022 रोजी ही योजना स्थगित ठेवण्यात आली होती. आता पुन्हा ही अनुदान योजना लागू करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सुमारे 5650 वाहनांना खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे.