इरोम शर्मिला यांना पुन्हा अटक

0
212

मानवी हक्कांसाठी गेली अनेक वर्षे उपोषण करत असलेल्या कार्यकर्त्या इरोम चानू शर्मिला यांना मुक्त केल्याच्या अवघ्या ४८ तासांनंतर काल पुन्हा अटक करून १५ दिवस न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. दोन दिवसांपूर्वी कोर्टाने त्यांना मुक्त करण्याचे आदेश दिले होते. ४२ वर्षीय शर्मिला यांनी काल पुन्हा उपोषण सुरू केल्यानंतर पोलिसांनी त्यांना सक्तीने नजीकच्या जवाहरलाल नेहरू इस्पितळात दाखल केले. गेली १४वर्षे इरोम शर्मिला इशान्य भारतातील लष्कर विशेषाधिकार कायदा मागे घ्यावा या मागणीसाठी उपोषण करीत आहेत. त्यांना इस्पितळात नाकातून पाईपद्वारे सक्तीने जेवण दिले जात आहे.