इराणच्या लष्कराने सुमारे 200 ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी इस्रायलवर हल्ला केला आहे. मात्र अमेरिकन सैन्याने त्यातील काही ड्रोन पाडले आहेत. त्याचवेळी इस्रायलच्या आयर्न डोमने इराणने डागलेली क्षेपणास्त्रे रोखली. या हल्ल्यामुळे
इस्रायलच्या लष्करी तळाचेही नुकसान झाले आहे. गेल्या 1 एप्रिल रोजी इस्रायलने सीरियातील इराणी दूतावास जवळ हवाई हल्ला केला. यामध्ये इराणच्या दोन सर्वोच्च लष्करी कमांडरसह 13 जण मारले गेले. यानंतर इराणने बदला म्हणून इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. इस्त्रायलने दावा केला आहे की इस्त्रायली संरक्षण दलांनी शनिवारी रात्री उशिरा इराणने केलेले 99% हल्ले हाणून पाडले. याचे सर्व श्रेय आयर्न डोम आणि एरो 3 संरक्षण यंत्रणेला दिले जात आहे. नेतन्याहू पुन्हा युद्ध मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. सकाळच्या बैठकीत काही सदस्यांनी इराणवर प्रहार करण्याची सूचना केली होती. मात्र, नेतन्याहू यांनी चर्चेनंतर बदला घेण्याचा निर्णय रद्द करण्यात आला.
भारतीयांसाठी हेल्पलाईन
इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी हेल्पलाइन जारी करण्यात आली आहेइराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलमधील भारतीय दूतावासाने एक सूचना जारी केली आहे. इस्रायलमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना शांतता राखण्यास आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले आहे.