इफ्फीसाठी ११८० रुपये शुल्क

0
28

>> विद्यार्थ्यांसाठी मात्र शुल्क नाही

गोव्यात येत्या दि. २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) आयोजन केले जाणार आहे. या महोत्सवासाठी नावनोंदणी सुरू झाली असून यासाठी यंदा ११८० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क चित्रपट व्यावसायिक आणि चित्रपटप्रेमींसाठी आहे. यात १८ टक्के वस्तू आणि सेवाकराचा समावेश करण्यात आला आहे. मात्र विद्यार्थी प्रतिनिधींसाठी शुल्क आकारले जाणार नाही. सुरुवातीला प्रतिनिधी नोंदणी ३०० रुपये होती, नंतर त्यात वाढ करून इफ्फीचे नोंदणी शुल्क १ हजार रुपये करण्यात आले होते.

इफ्फीच्या या वाढलेल्या शुल्कावरून प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली होती. चित्रपटप्रेमींना नेटफ्लिक्स, मेझॉन प्राईम, झी-५, वूट आणि सोनी लाईव्ह या ओटीटी माध्यमातून इफ्फीचा आनंद लुटता येणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात कोरोनामुळे इतर व्यवसायाप्रमाणेच कोरोना काळात सिनेमागृहे बंद होती, तेव्हा ओटीटी माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता.

या महोत्सवात जगभरातील ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, नृत्य दिग्दर्शक आदी २२ प्रसिद्ध अतिथींचा सहभाग असणार आहे.