इफ्फीच्या पॅनोरमा विभागाचा ‘सेमखोर’ चित्रपटाने प्रारंभ

0
22

>> इंडियन पॅनोरमा विभागासाठी २५ फिल्मची निवड

इफ्फीच्या इंडियन पॅनोरमा विभागातील शुभारंभी चित्रपटांची निवड काल करण्यात आली. ५२व्या इफ्फीच्या पॅनोरमा विभागातील शुभारंभी चित्रपट हा ‘दिमासा’ या भाषेतील असून ‘सेमखोर’ असे या चित्रपटाचे नाव आहे. आममी बरुआ यांनी ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. तर पॅनोरमा विभागातील नॉन फिचर गटातील शुभारंभी फिल्मसाठी ‘वेट…. द व्हिजनरी’ ह्या राजीव प्रकाश दिग्दर्शित चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.

इंडियन पॅनोरमा विभागासाठी एकूण २५ फीचर फिल्मची निवड करण्यात आली आहे. नॉन किलर गटात २० चित्रपटांचा समावेश असून त्यात एक आसामी, दोन बंगाली, तीन इंग्रजी, एक गुजराती, सात हिंदी, एक मणिपुरी, एक मराठी अशा चित्रपटांचा समावेश आहे.

इंडियन पॅनोरमा विभागात
एकही कोकणी चित्रपट नाही

दरम्यान, इंडियन पॅनोरमा विभागासाठी यंदा २५ किलर फिल्म व २० नॉन फिचर फिल्मची निवड झालेली असून ज्या गोव्यात हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत आहे, त्या गोव्याची राजभाषा असलेला कोकणी भाषेतील एकाही चित्रपटाची निवड झालेली नाही. किलर फिल्म तसेच नॉन किलर फिल्म अशा इंडियन पॅनोरमाच्या दोन्हीही विभागात एकाही कोकणी फिल्मची निवड झालेली नाही.