येत्या नोव्हेंबर महिन्यात राज्यात होणार असलेल्या 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे पोस्टर तसेच ट्रेलरचे प्रदर्शन उद्या मंगळवार दि. 16 मेपासून सुरू होणार असलेल्या ‘कान’ (फ्रान्स) चित्रपटमहोत्सवात होणार आहे. केंद्रिय माहिती आणि प्रसारण राज्य मंत्रालय वरील महोत्सवात इफ्फीतील ‘टुमरोज 75 क्रिएटिव्ह माईंड्स’ या उपक्रमाच्या यशस्वी गाथेची माहितीही कान महोत्सवात देणार आहेत आणि जगभरातील चित्रपट क्षेत्रातील लोकांनी त्यासाठी इफ्फीशी सहयोगी करण्याचे आवाहनही करणार येणार आहे.