इंफाळ येथील स्फोटात  तीन जण जागीच ठार

0
76

मणिपूरची राजधानी इंफाळ रविवारी सकाळी बॉम्बस्फोटाने हादरली. ‘आयईडी’च्या साहाय्याने हा बॉम्बस्फोट घडवून आणल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या स्फोटात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची स्थिती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट आयईडीच्या साहाय्याने घडवला गेला. या स्फोटात दहशतवाद्यांचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या जोरदार स्फोटांमुळे जखमी झालेल्यांना जवळच्याच इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी या स्फोटाची चौकशी सुरू केली आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. हा स्फोट घडवून आणण्यामागच्या कारणांचाही शोध सुरू आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यातही येथे एक बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. या स्फोटात एक जण ठार झाला होता तर पाच जण जखमी झाले होते.