इंडोनेशियाच्या शनिवारी कोसळलेल्या श्रीविजया एअरलाइन्सच्या एसजे १८२ या विमानाचे अवशेष सापडले असून विमानाच्या तुकड्यांसह काही प्रवाशांच्या मृतदेहाचे भाग सापडले आहेत. तर, विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ब्लॅक बॉक्स सापडल्यास विमान अपघाताचे कारण समोर येण्याची दाट शक्यता आहे. या विमानात या विमानात क्रू सदस्यांसह ६२ जण होते. त्यात ५० प्रवासी होते. सध्या विमानातील प्रवाशांचे मृतदेह आणि विमानाचे अवशेष शोधण्याचे काम सुरू आहे.
जावा समुद्रात २३ मीटर खोल विमानाचे अवशेष तसेच प्रवाशांच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले. दरम्यान, आतापर्यंत विमान अपघाताचे नेमके कारण समोर आलेले नाही. त्याशिवाय या विमानातील एकही जण जिवंत असेल याची खात्री नसल्याचे अधिकार्यांनी सांगितले. हे विमान इंडोनेशियाच्या लाकी बेटाजवळ कोसळले.