इंडिगो विमानाच्या इंजिनाला आग; सर्व प्रवासी सुखरुप

0
12

दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दुपारी गोवा ते मुंबई जाणार्‍या इंडिगो विमानाच्या इंजिनाला आग लागली. त्यानंतर लगेचच विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. या विमानात १८७ प्रवासी आणि इंडिगोचे चार कर्मचारी होते. दरम्यान, सायंकाळी ६ वाजता दुसर्‍या विमानाने सर्व प्रवाशांना मुंबई पाठवण्यात आले.

मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास इंडिगो प्रवासी विमान (६ ई ६०९७) गोव्याहून मुंबईकडे प्रयाण करण्याच्या तयारीत असताना विमानाच्या मागच्या बाजूस इंजिनाला आग लागली. ही बाब नौदलाच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित सर्व प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढले.