इंग्रजी शाळांना अनुदानाचा कायदा न केल्यास सरकारला धडा शिकवू

0
90

>> ‘फोर्स’चा निर्वाणीचा इशारा

 

ाथमिक शाळांना अनुदान देण्याचा कायदा विधानसभेत मंजूर करावा. इतर प्रादेशिक भाषांतील शाळांना अनुदान देतात तसे इंग्रजीला देण्याचा कायदा संमत न केल्यास ‘फोर्स’ येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा सरकारला त्यांची जागा दाखवून देणार असा इशारा फोर्सच्या सर्वसाधारण सभेत देण्यात आल्याचे फोर्सचे सरचिटणीस सावियो लोपीस यांनी सांगितले.
इंग्रजी माध्यमांतील शाळांना अनुदान देणारा कायदा करावा यासाठी आझाद मैदानावर फोर्सने उपोषण आंदोलन छेडले होते. त्यावेळी ११ आमदार व मंत्र्यांनी भेट देवून विधानसभेत ठराव आणण्याचे आश्‍वासन दिले होते. त्या आश्‍वासनासंबंधी विचारपूस करण्यासाठी फोर्सचे पालक त्या आमदार व मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या विधानसभा निवडणुकीत फोर्सने भाजपा विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी भाजपा नेत्यांनी माध्यमप्रश्‍नी समझोत्याने निर्णय घेण्याचे आश्‍वासन निवडणूक जाहिरनाम्यात दिले होते. त्यानंतर भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता असे सावियो यांनी सांगितले.
फोर्सने कोणत्याही राजकीय पक्षाशी संपर्क साधलेला नाही. मात्र, राजकीय पक्षाने आपली माध्यमप्रश्‍नी भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्या पक्षाबरोबर राहण्याचा निर्णय फोर्स घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या नेत्यांवर त्यांनी यावेळी टीका केली.