आसाममधील सर्व सरकारी मदरसे बंद करण्याचा निर्णय

0
249

येत्या नोव्हेंबरपासून आसाम सरकारने राज्यातील सर्व सरकारी मदरसे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आसामचे आरोग्य आणि शिक्षणमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी ही माहिती दिली.
सरकारी पैशांवर कुराणाचे शिक्षण दिले जाऊ शकत नाही. तसे असेल तर आपण बायबल आणि गीताही शिकवली पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. आम्हाला समानता आणायची असल्याने आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. येत्या नोव्हेंबर महिन्यापासून आसाममधील सर्व सरकारी मदरसे बंद केले जातील. सरकार लवकरच यासंबंधी परिपत्रक प्रसिद्ध करणार आहे, अशी माहिती हेमंत बिस्व सरमा यांनी दिली. त्यांनी पुढे, सर्व सरकारी मदरशांचे नियमित शाळांमध्ये रुपांतर केले जाईल. तसेच काही प्रकरणांमध्ये शिक्षकांची सरकारी शाळेत बदली केली जाईल अशी माहिती दिली.