>> माजी मंत्री मिकी पाशेको यांची मागणी
एखाद्या विदेशी नागरिक भारतात किंवा गोव्यात एखाद्या सरकारात मंत्रीपदी कसा असू शकतो, असा प्रश्न करून माजी मंत्री मिकी पाशेको यांनी मुख्यमंत्री सावंत यांनी आलेक्स सिक्वेरा यांचे मंत्रीपद काढून घ्यावे अशी मागणी केली.
विद्यमान पर्यावरण मंत्री व नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी 2001 मध्ये आपण पोर्तुगीज नागरिक म्हणून नोंदणी केली होती. शिवाय विवाहाची नोंदणीसुद्धा पोर्तुगालमध्ये केली आहे. पोर्तुगालचा नागरिक म्हणून पोर्तुगाल सरकारकडे प्रमाणपत्र आहे, असेही पाशेको यांनी सांगितले.
सिक्वेरा यांची आमदारकी रद्द करावी. भारतीय पासपोर्ट रद्द करून त्याला ओसीआय प्रमाणपत्र देण्यात यावे. आपण त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे असे पाशेको यांनी सांगितले. पोर्तुगीज नागरिकत्त्व रद्द केले असेल तर न्यायालयात ते सिद्ध करावे असे आव्हानही पाशेको यांनी सिक्वेरा यांना दिले. विदेशी नागरिकाकडे शेतजमीन असू नये किंवा त्याला विकत घेण्याचे अधिकार नाहीत. मात्र, असे असूनही त्यांनी कित्येक चौ. मी. शेतजमीन विकत घेतली आहे, असा आरोप पाशेको यांनी केला आहे.
पर्यावरण मंत्री व नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी 2001 मध्ये पोर्तुगीज नागरिक म्हणून नोंदणी केली होती. शिवाय विवाहाची नोंदणीसुद्धा पोर्तुगालमध्ये केली आहे. पोर्तुगालचा नागरिक म्हणून पोर्तुगाल सरकारकडे प्रमाणपत्र आहे.
- मिकी पाशेको, माजी मंत्री