आला पावसाळा; आरोग्य सांभाळा

0
477
  •  डॉ. विजय नाईक
    (हेल्थ-वे हॉस्पिटल)

मान्सूनच्या काळात आमच्या शरिरातील रोगाशी लढणार्‍या पांढर्‍या पेशी सतत हवामान बदलामुळे कमकुवत होतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो व आम्हाला अनेक प्रकारचे इन्फेक्शन होतात. त्यामुळे आम्ही आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन डास, पाणी, हवा व अन्न यांच्यातून होणार्‍या इन्फेक्शनपासून स्वत:चा बचाव केला पाहिजे.

पसरलेला कोविड -१९ साथीचा रोग थांबविण्यासाठी हातांच्या स्वच्छतेवर जागरूकता ठेवा. कारण वारंवार हात धुतल्याने, स्वच्छ केल्याने तसेच खोकला शिष्टाचार, मुखवटे परिधान आणि सामाजिक अंतर पाळून या मान्सूनच्या खाडीत हवा आणि पाण्यामुळे होणारे आजार आणि मलेरियाचा प्रसार रोखता येतो.

पावसाळ्यात तापमानातील चढउतारांमुळे प्रतिकारशक्ती कमी होते. व्हायरल ताप हा पावसाळ्याच्या सर्वात सामान्य आजारांपैकी एक आहे आणि हा अचानक उद्भवलेल्या हवामानातील बदलांमुळे होतो
ज्याप्रमाणे मान्सूनची सर गोव्यातील हजारो लोकांना सुखद अनुभव देते त्याचप्रमाणे या ऋतूमध्ये अनेक जीवघेणे हवा तसेच पाण्याशी संबंधित रोगांचा फैलावही होतो. गॅस्ट्रोएन्टरायटीस, मलेरिया, डेंग्यूचा ताप, चिकुनगुनिया, टायफॉइड, कॉलेरा, हिपॅटायटिस-ए व सर्दी हे रोग समस्या निर्माण करू शकतात.

पावसाचे पाणी थेट आपल्या शरिरावर परिणाम करत नाही पण या दिवसांमध्ये व्हायरल रोग व बॅक्टेरिया जे या दिवसांत जमिनीवर उतरतात. यामुळे रोगराई होण्याची जास्त शक्यता असते. आमची रोगप्रतिकारक शक्ती काही प्रमाणांत या रोगांवर मात करू शकते पण काही रोगांचा सामना आमची रोगप्रतिकारक शक्ती नाही करू शकत.

शरिरातील पांढर्‍या पेश्या ही शरीराची संरक्षक भिंत आहे. ही भिंत इन्फेक्शनशी सामना करून आमचे स्वास्थ्य निरोगी ठेवते. पण मान्सूनच्या काळात या पांढर्‍या पेशी सतत हवामान बदलामुळे कमकुवत होतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो व आम्हाला अनेक प्रकारचे इन्फेक्शन होतात. त्यामुळे आम्ही आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन डास, पाणी, हवा व अन्न यांच्यातून होणार्‍या इन्फेक्शनपासून स्वत:चा बचाव केला पाहिजे.
निरंतर पाऊस, थंड हवा व ओलसर कपडे हे बॅक्टेरिया, व्हायरस किंवा बुरशी या इन्फेक्शन फैलावणार्‍या जंतूंसाठी उपयुक्त असतात. जर याबद्दल आम्ही योग्य ती दक्षता घेतली नाही तर एखाद्या व्यक्तिला फंगल व श्वासासंबंधी संक्रमण, डायरिया, गॅस्ट्रोएन्टरायटीस लेप्टोसिरोसिस व व्हायरल ताप येणे अशाप्रकारचे रोग होऊ शकतात.

व्हायरल ताप हा फटीग, चिल्स, अंगदुखी व अनियमित ताप येणे अशा लक्षणांद्वारे दिसू शकतो. हे आजार संक्रामक असतात व हवेमधून किंवा रोगींच्या शारिरीक संपर्कातून इन्फेक्शनचे थेंब येऊन रोग होऊ शकतात. या वायरल इन्फेक्शनचा कालावधी साधारण ३ दिवस ते ७ दिवसांपर्यंत असतो. पहिले तीन दिवस ताप जास्त असतो. व्हायरल तापाला रोखण्यासाठी एखाद्याने भिजणे टाळावे किंवा ओलसर कपडे घालू नये. जेवणाआधी हात धुतल्याने पोषक अन्न पोटात जातेच व त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.

* डेंग्यू, चिकुनगुनिया व मलेरिया यापासून बचाव करण्यासाठी स्थिर पाण्याचे पृष्ठभाग किंवा कंटेनर साफ करा आणि सभोवताली स्वच्छ ठेवा. डासांपासून बचावासाठी जाळे व संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे घाला. डासांपासून होणार्‍या रोगांना रोखण्यासाठी मलेरियाविरोधी औषध घ्या.

* सरळ व सोपी दक्षता घेतल्यास पावसाळ्यात एखाद्याला गजकर्ण, खरुज व एक्झिमा या त्वचारोगांपासून बचाव करता येईल. काही त्वचेचे रोग स्वच्छता राखून, स्वच्छ व सुके कपडे व अंतरवस्त्र घालून दूर ठेवता येतील. रोगी व्यक्तिपासून थेट संपर्क टाळावा.

* हाताची स्वच्छता, खोकतानाचा शिष्टाचार, डोळे सतत धुणे, शक्य होईल तेवढे गर्दीपासून लांब राहणे, संतुलित आहार घेणे, स्वच्छ पाणी पिणे, भाज्या स्वच्छ धुवून उकडाव्यात हे काही मुलभूत मंत्र आहेत, त्यांचे पालन करावे.
काही रोग आहेत जे आपण होण्यापासून टाळू शकतो व यांवर डॉक्टरच्या थोड्या मार्गदर्शनाच्या सहाय्याने देखील घरबसल्या उपचार करता येतात. पण काही रोगांना व्यवस्थित उपचाराची गरज असते व त्यावर नजर ठेवणे महत्वाचे बनते अन्यथा ते प्राणघातक ठरू शकतात.

* मान्सूनमध्ये निरोगी राहण्यासाठी काही टीप्स…..
– हात स्वच्छ धुवा
– शिंकताना व खोकताना रुमालाने तोंड बंद करा
– कोमट पाण्याने डोळे धुवा
– गर्दीची ठिकाणे शक्यतो टाळा
– संतुलित आहार घ्या
– स्वच्छ पाणी प्या. पाणी पिण्याआधी गरम करून मग थंड झालेले पाणी पिणे उत्तम
– भाज्या धुवून त्या व्यवस्थित शिजवा
– पावसात भिजणे व अधिक वेळ ओलसर कपडे घालणे टाळा
– स्थिर पाण्याचे पृष्ठभाग किंवा कंटेनर साफ करा आणि सभोवताली स्वच्छ ठेवा जेणेकरून डासाची पैदास टाळता येईल
– डासांची पैदास होऊ नये म्हणून परिसर स्वच्छ ठेवा
– ताप, सर्दी, खोकला वगैरे झाल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषध घ्या.