शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावरील उर्वरित सुनावणी आता २७ ऑक्टोबरला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी आज बुधवारी दुपारी अडीच वाजता निश्चित केली आहे. आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांनी न्यायालयात आपली बाजू मांडली आहे. त्यांच्यानंतर अमित देसाई अरबाज मर्चंटच्या जामिनाच्या बाजूने युक्तिवाद करत होते. यावेळी न्यायालयाने पुढील सुनावणी आज बुधवारी दुपारपर्यंत तहकूब केली. न्यायालय शुक्रवार दि. २९ ऑक्टोबरपर्यंत खुले राहणार आहे. त्यानंतर शनिवार आणि रविवारी सुट्टी असेल. त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होतील.