आरोग्य विमा योजनेवर विरोधकांकडून निरर्थक टीका

0
73

>>उपमुख्यमंत्री ङ्ग्रान्सिस डिसोझांचा दावा

 

भाजपा सरकारने सुरू केलेल्या आरोग्य विमा योजनेवर कोणत्याही प्रकारची टीका करायला मिळत नाही म्हणून आता विरोधक या योजनेत घोटाळा असल्याची टीका करतात. लोकांच्या हितासाठी ही योजना राबविण्यात येणार असून त्यात घोटाळा असल्याचे सांगायचा कुणाला अधिकार नसल्याचे प्रतिपादन
उपमुख्यमंत्री ऍड. ङ्ग्रान्सिस डिसोझा यांनी केले आहे. या योजनेचा प्रत्येक तालुक्यातील नागरिकांना लाभ मिळावा या हेतूने काल चिखली कुटीर रुग्णालयात मुरगाव तालुक्यातील चारही मतदार केंद्रातील लोकांसाठी आरोग्य खाते व गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमार्ङ्गत केंद्र सुरू करण्यात आले. यावेळी डिसोझा प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी वास्कोचे आमदार कार्लूस आल्मेदा, कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा, मुरगाव नगराध्यक्ष दीपक नाईक, उपनगराध्यक्ष शशिकांत परब, नगरसेवक नंदादीप राऊत, मुरगाव भाजपा गटाध्यक्ष संजय सातार्डेकर, चिखलीच्या सरपंच प्रज्योती कुडाळकर आदी उपस्थित होते. दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो व वीजमंत्री मिलिंद नाईक उपस्थित नव्हते. डिसोझा यांनी सांगितले की, सर्वांना समानतेची वागणूक देऊनच सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत. यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री एलिना साल्ढाणा यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.