‘आरटीआय’चा वापर राज्य हितासाठी व्हावा

0
10

>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे प्रतिपादन

माहिती हक्क कायद्याची (आरटीआय) अंमलबजावणी ही समतोलपणे व्हायला हवी. या कायद्याचा गैरवापर होता कामा नये. तसेच कायद्याचा वापर कमी देखील होता कामा नये. या कायद्याचा वापर हा योग्य प्रकारे व राज्य आणि देशाच्या हितासाठी व्हायला हवा, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल काढले.

भारतीय माहिती आयोगाच्या राष्ट्रीय महासंघाच्या सर्वसाधारण सभेत बोलताना त्यांनी हे उद्गार काढले. राज्य प्रशासनासंबंधीची महत्त्वाची माहिती स्वतःहून सार्वजनिक करण्याच्याबाबतीत राज्य सरकारने अत्यंत चांगले काम केलेले आहे. राज्य प्रशासनातील माहिती जनतेपुढे ठेवण्याच्या कार्यामुळे कामकाजात कधी नव्हे एवढी पारदर्शकता आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.