>> गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांची माहिती
गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी एससी, एसटी, ओबीसी उमेदवारांना आरक्षण देण्याबाबतची फाईल राज्य सरकारला पाठविण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी ओबीसी नेत्यांच्या एका शिष्टमंडळाला काल दिली.
राज्यात पदव्युत्तर स्तरावरील वैद्यकीय आणि दंतविज्ञान अभ्यासक्रमांमध्ये ओबीसी, एससी आणि एसटी आरक्षणाचा विषय मुख्य चर्चेचा बनलेला आहे.
ओबीसी समाजातील नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांची भेट घेऊन पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी एससी, एसटी, ओबीसी उमेदवारांना आरक्षणाच्या विषयावर चर्चा केली. गोमेकॉमध्ये एससी, एसटी, ओबीसीना पदव्युत्तर आरक्षणासंबंधीची फाईल मान्यतेसाठी कित्येक महिन्यापूर्वी सरकारकडे पाठविल्याचे डीन डॉ. बांदेकर यांनी स्पष्ट केले. या शिष्टमंडळामध्ये ओबीसी समाजातील नेते रामराव वाघ, भंडारी समाज संस्थेचे अध्यक्ष अशोक नाईक, गिरीश चोडणकर आदींचा समावेश होता.
राज्यात गोमेकॉमध्ये एससी, एसटी, ओबीसी यांना पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. ओबीसी समाजातील नेत्यांनी काही दिवसांपूर्वी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करून पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आरक्षण देण्याची मागणी केली आहे.