आयपीबीच्या ओएसडींना कॉंग्रेस नेत्यांचा घेराव

0
115
आयपीबीच्या ओएसडींना कॉंग्रेस नेत्यांनी घेराव घातला त्यावेळी.

पणजी (न. प्र.)
गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचे चेअरमन असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गैरहजेरीत मंडळाने नव्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याचा आरोप करीत काल कॉंग्रेस पक्षाने या मंडळाचे ओएसडी तुळशीदास पै यांना घेराव घालून धारेवर धरले.
युवा कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, कॉंग्रेस प्रवक्ते अमरनाथ पणजीकर, प्रसाद आमोणकर, विजय भिके, जनार्दन भंडारी व ऍड. दिया शेटकर यांनी पै यांना घेराव घालून त्यांना धारेवर धरले.