इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना २४ मे रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळविला जाणार आहे. ‘कन्कशन सबस्ट्यिट्यूट’ तसेच तिसर्या पंचांद्वारे ‘नो बॉल’ देण्याचा प्रयोगही यावेळी आयपीएलमध्ये प्रथमच करण्यात येणार आहे. मागील मोसमाप्रमाणेच यावेळी देखील रात्रीच्या वेळी होणारे सामने ८ वाजता सुरु होणार आहेत, असे आयपीएल स्पर्धा संचालन समितीच्या बैठकीनंतर भारतीय क्रिकेट निमायक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी जाहीर केले.
एका दिवशी दोन सामन्यांची संख्या यावेळी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ पाच वेळा (दुपारी ४ व रात्री ८) दोन सामने होणार आहेत. यंदा आयपीएलमध्ये डे-नाईट सामन्याची वेळ ८ ऐवजी ७.३० करण्याचा प्रस्ताव संघ मालकांनी ठेवला होता. पण बैठकीत हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. तसेच आयपीएलमधील अंतिम सामना अहमदाबाद येथील मैदानात होणार अशीच चर्चा होती. पण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने ‘ग्रँड फिनाले’ मुंबईत होणार असल्याचे स्पष्ट केले.