महाराष्ट्र मच्छीमारी कायद्याखाली मालवण तहसीलदारांनी एलईडीद्वारे मासेमारी प्रकरणी दोन मच्छीमारी बोटी जप्त केल्या असून या मच्छीमारी बोटींचे परवाने रद्द करण्याची सिफारस केली आहे. यात सांत आंद्रेचे भाजप आमदार फ्रान्सीस सिल्वेरा यांच्या बोटीला ३ लाखांचा दंड काल ठोठावला. आमदार सिल्वेरा यांची मच्छीमारी (ट्रॉलर) बोट आणि मच्छीमारी साहित्य, पकडण्यात आलेले मासे जप्त केले असून बोटीचा परवाना रद्द केला आहे.
मालवण परिसरातील समुद्रात एलीडीद्वारे मच्छीमारी करताना आमदार सिल्वेरा यांची मच्छीमारी बोट ताब्यात घेण्यात आली आहे. त्यानंतर मालवण तहसीलदारांनी आमदार सिल्वेरा यांना समन्स जारी करून सुनावणीसाठी १९ डिसेंबरला उपस्थित राहण्याची सूचना केली होती. तथापि, आमदार सिल्वेरा सुनावणीसाठी हजर राहिले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राज्यात एलईडीद्वारे मच्छीमारीवर कारवाई केली जात नसल्याने बहुतांश मच्छीमारी बोटींना एलईडी लाइट बसविण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती आमदार सिल्वेरा यांनी अनौपचारिक बोलताना काल दिली. मालवण येथे पकडण्यात आलेल्या मच्छीमारी बोटीबाबत बोलण्याचे आमदार सिल्वेरा यांनी टाळले.