आमदार फोडण्यासाठी भाजपकडून लाच

0
100

केजरीवाल यांचा आरोप
दिल्लीत सरकार स्थापनेसाठी भाजपकडून हालचाली सुरू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल आमआदमी पक्षाने (आप) भाजपकडून आपच्या आमदारांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी लाच देण्याचे प्रयत्न चालविण्यात येत असल्याचा आरोप केला. भाजपच्या दिल्लीतील एका ज्येष्ठ नेत्यावर आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत तसा आरोप केला आहे.
दिल्ली भाजपाचे उपाध्यक्ष शेरसिंग डागर यांनी आपले आमदार दिनेश मोहनिया चार कोटी रुपयांची लाच देऊ केल्याचा आरोप केजरीवाल यानी केला. आपल्या या आरोपाच्या समर्थनार्थ स्टिंग ऑपरेशनची सीडीही पत्रकारांना दाखवली.तथापि डागर यानी हा आरोप फेटाळला असून आपल्याविरोधात कारस्थान रचले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपण राजकारणात ४४ वर्षांपासून आहे. आपल्यावरील आरोप सिद्ध झाल्यास आपण राजकारण संन्यास घेऊ असे ते म्हणाले. तसेच कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर केजरीवाल यांनी वरील आरोपांसदर्भातील स्टिंग ऑपरेशनची सीडी सर्वोच्च न्यायालयासमोर आज ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.