मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात कॉंग्रेस आणि मगोने १२ बंडखोर आमदारांच्याविरोधात दाखल केलेल्या अपात्रता याचिकेत गोवा फॉरवर्डने हस्तक्षेप याचिका दाखल केली असून, या प्रकरणी अंतिम सुनावणी १० डिसेंबर रोजी होणार आहे.
आमदार अपात्रता याचिका प्रकरणी सभापती राजेश पाटणेकर यांनी दिलेल्या निवाड्याला कॉंग्रेस आणि मगोने गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. या दोन्ही याचिकांवर सोमवारी एकत्रित सुनावणी घेण्यात आली. या आमदार अपात्रता प्रकरणाच्या याचिकेत गोवा फॉरवर्डने हस्तक्षेप याचिका सादर करून कॉंग्रेस व मगोच्या याचिकांचे समर्थन केले आहे. या तिन्ही याचिकांवर येत्या १० डिसेंबरला अंतिम सुनावणी ठेवण्यात आली आहे.