आमदार अपात्रता; अंतिम सुनावणीला प्रारंभ

0
13

गोवा विधानसभेच्या सभापतींसमोर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पक्षांतर बंदी कायद्याखाली आमदार दिगंबर कामत आणि आमदार मायकल लोबो यांच्याविरोधात दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर कालपासून अंतिम सुनावणीला सुरुवात झाली. काल काँग्रेसच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला, तर बुधवारी कामत व लोबो यांच्या वतीने युक्तिवाद करण्यात येणार आहे. गोवा विधानसभेच्या वर्ष 2022 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आल्यानंतर कामत आणि लोबो यांनी जुलै 2022 मध्ये पक्षांतरासाठी हालचाल केल्यानंतर अमित पाटकर यांनी त्या दोघांच्या विरोधात सभापतींसमोर आमदार अपात्रता याचिका दाखल केली होती. त्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये काँग्रेसच्या आठ आमदारांनी बंडखोरी करून भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यात कामत आणि लोबो यांचा समावेश होता.