गोव्यातील कॉंग्रेसमधील १० तर मगो पक्षाच्या दोन फुटीरवादी आमदारांवरील अपात्रतेसंबंधीच्या दोन याचिकांवरील सुनावणी काल परत एकदा सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली. आता ही सुनावणी येत्या २६ रोजी होणार आहे.
कॉंग्रेसमधून फुटून सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० तर मगो पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १२ आमदारांवर दोन वेगवेगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयापुढे असून त्यावर ११ ऑगस्ट रोजी सुनावणी झाली होती. तसेच पुढील सुनावणी १२ ऑक्टोबर रोजी होणार होती.
या दोन्ही याचिकांवरील सुनावणी तातडीने व विनाविलंब घेण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेसने केली होती. तसेच या याचिकांवरील सुनावणी दोन आठवड्यानंतर होईल असे न्यायालयाने ११ ऑगस्ट २०२० रोजी स्पष्ट केले होते ही बाबही कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारच्या नजरेत आणून दिली होती.