आप भाजपची बी टीम : मेहंदी

0
14

मतदारांना खोटी आश्‍वासने देणारी अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष म्हणजे भाजपची ‘बी टीम’ आहे, असा आरोप काल दिल्ली कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अली मेहंदी यांनी केला. केजरीवाल हे गोव्यातील मतदारांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर खोटी आश्‍वासने देत असून, त्यांचा खोटारडेपणा आता उघड झाला आहे, असेही ते म्हणाले.

कॉंग्रेसची मते फुटावीत आणि भाजप सत्तेवर यावा, यासाठीच केजरीवाल यांचे प्रयत्न असून, त्यांच्या या गोवा दौर्‍यात त्यांना भाजपलाच फायदा करून द्यायचा आहे, असा आरोपही त्यांनी केला. केजरीवाल यांना दिल्लीतील अंगणवाडी कर्मचार्‍यांना वेतन देण्यात अपयश आले आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचार्‍यांनी त्यांच्या निवासस्थानासमोर मंगळवारपासून धरणे धरले आहे, असेही मेहंदी म्हणाले.