पंजाबमध्ये सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाने सत्तेत आल्यास वर्षभर मोफत आठ गॅस सिलिंडर आणि गरीब, गरजू महिलांना प्रत्येक महिन्याला ११०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी यांनी ही घोषणा केली. पंजाबमध्ये २० फेब्रुवारी रोजी ११७ जागांसाठी मतदान होणार आहे.