आज कंकणाकृती सूर्यग्रहण

0
105

या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज गुरूवार दि. २६ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ११ वाजेपर्यंत होणार आहे. आज होणार्‍या या सूर्यग्रहणाची सुरूवात सकाळी ७ वाजून ५९ मिनिटांवर होणार आहे. १० वाजून ४७ मिनिटांवर सूर्यग्रहण मध्यभागी असेल त्यामुळे जवळपास साडेतीन मिनिट सूर्यग्रहण असणार आहे. त्यानंतर १०.५७ वा. सूर्यग्रहण संपणार आहे. हे सूर्यग्रहण कंकणाकृती असेल. पृथ्वी भोवतालाचे चंद्र कक्ष लांब आणि वर्तुळाकार असते. त्यामुळे चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर बदलत असते. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर जास्त असल्याने चंद्र, पृथ्वी, आणि सूर्य एक रेषेत आल्याने चंद्रा सूर्यापेक्षा लहान असल्याने सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही. त्यामुळे चंद्रामागे झाकलेल्या सूर्याचा आकार बांगडी सारखा दिसतो. ह्या स्थितीला कंकणाकृती म्हणतात.