आजादी का अमृत महोत्सवला १.५ कोटी भारतीयांचा प्रतिसाद

0
34

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी राष्ट्रगीताचे गायन करून संपूर्ण देशाने आजादी का अमृतमहोत्सवमध्ये मोठ्या प्रमाणात सहगभाग दर्शवला. भारतातील आणि जगभरातील १.५ कोटीपेक्षा जास्त भारतीयांनी आपले व्हिडिओ रेकॉर्ड करून आणि अपलोड करून या विशेष प्रसंगी एका अभूतपूर्व विक्रमाची नोंद केली आहे. २५ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये भारताच्या जनतेला एकत्र राष्ट्रगीत गाण्याचा नारा दिला होता.

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने लोकांना १५ ऑगस्टपर्यंत राष्ट्रगीताचे गायन करता यावे आणि ते वेबसाईटवर अपलोड करता यावे म्हणून एक प्रोग्राम तयार केला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमात देशाच्या सर्व भागातील, सर्व स्तरातील जनतेने उत्साहाने विक्रमी संख्येने सहभाग घेतला आहे आणि त्यांनी एका सुरात राष्ट्रगीताचे गायन केले. भारताबाहेर राहणार्‍यांनीही यात उत्साहाने भाग घेतला.