येथील हवामान विभागाने 18 ते 21 जून या चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात चोवीस तासांत 1.25 इंच पावसाची नोंद झाली. राज्यात जुने गोवे येथे सर्वाधिक 2.55 इंच पावसाची नोंद झाली. सांगे येथे 2.10 इंच, काणकोण येथे 1.74 इंच, साखळी येथे 1.66 इंच, मडगाव येथे 1.33 इंच, पेडणे येथे 1.11 इंच अशा पावसाची नोंद झाली. म्हापसा, फोंडा, पणजी, दाबोळी, मुरगाव येथेही पावसाची नोंद झाली.