राज्यातील केरी, पत्रादेवी आणि पोळे या 3 सीमेवरील तपासणी नाक्यावर स्वयंचलित वाहतूक अंमलबजावणी प्रणाली मंगळवार दि. 9 डिसेंबरपासून लागू केली जाणार आहे, अशी घोषणा राज्य सरकारच्या वाहतूक संचालनालयाने काल केली. या नवीन प्रणाली अंतर्गत, गोवा वाहन प्रमाणीकरण प्रणाली (जीओव्हीए) द्वारे वाहतूक उल्लंघनांची स्वयंचलितपणे नोंद केली जाणार आहे. वाहतूक नियम उल्लंघनांच्या गुन्ह्यांसाठी डिजिटल ई-चलन तयार केले जाणार आहे आणि नोंदणीकृत असलेल्या मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे पाठवले जाणार आहे. सध्या, राज्यातील सीमेवरील तपासणी नाक्यावर वाहन कागदपत्रांची पडताळणी अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हाताने केली जात आहे. गेल्या ऑक्टोबरपासून मोले येथील तपासणी नाक्यावर स्वयंचलित वाहतूक अंमलबजावणी प्रणाली सुरू करण्यात आली होती.

