आजपासून दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता

0
24

हवामानातील बदलामुळे सोमवार दि. १६ व मंगळवार दि. १७ मे रोजी राज्याच्या काही भागांत गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. हवामानातील बदलामुळे राज्यात अधूनमधून अवकाळी पावसाच्या सरी बरसू लागलेल्या असून, दोन दिवस राज्यात पावसाच्या जोरदार सरी बरसण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. राज्यात १७ मेपर्यंत पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, तर तर १८ मे रोजी हवामान स्वच्छ राहील. तसेच पुढील दोन दिवस कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.