आजच्या वादळाचा गोव्याला धोका नाही

0
288

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे निर्माण झालेल्या निवार वादळ वेगाने वाढत आहे. २५ नोव्हेंबरला हे वादळ तामिळनाडू, पुद्दुचेरी किनार्‍यावर धडकणार आहे. या वादळाचा गोव्यावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती येथील हवामान विभागाने काल दिली.
या वादळामुळे वार्‍याचा वेग १०० ते १२० किलोमीटर प्रतितास एवढा असून वार्‍याचा वेग १४५ किलोमीटर प्रतितासापर्यंत वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, अरबी समुद्रातील निर्माण झालेले गती नावाचे वादळ आखाती देश आणि सोमालियामध्ये धडकल्यानंतर शांत झाले आहे. त्या वादळाचा भारतावर फारसा परिणाम झाला नाही.