राज्यातील १० हजार सरकारी पदे भरण्यासाठी सरकारने भरती प्रक्रिया सुरू केली असून येणार्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी ही नोकरभरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. यापूर्वी ७५०० ते ८००० पदांसाठी जाहिरात देण्यात आली असून उर्वरित पदांसाठी आठवड्याभरात जाहिराती दिल्या जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ही सरकारी खात्यातील पदे भरतीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यात यावी अशी सूचना आपण २८ खातेप्रमुखांना केली असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, गोवा फॉरवर्ड, कॉंग्रेस, मगो व आम आदमी पक्षाने नोकरभरतीच्या प्रश्नावरून सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरूवात केली आहे. निवडणुकीपूर्वी ही १० हजार पदे भरून दाखवावीत असे आवाहन मुख्यमंत्र्यांना दिले आहे.