आगशी येथे जोडप्याची आत्महत्या

0
55
सुलाभाट-आगशी येथील एका विवाहित जोडप्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या करण्याच्या घटनेमुळे आगशी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नरसू गावस (४८) व पुष्पा (४०) अशी या पती-पत्नीची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या १५ वर्षांपासून हे जोडपे या घरात राहत होते.

त्यांना मुल नव्हते. नरसू एका बेकरीत कामाला होता. परवा रात्री कोणीतरी पोलिसांना फोन केल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोचले. तेव्हा घराला आतून कडी घातली होती. पोलिसांना दरवाजा उघडून पाहिल्यावर दोन्ही मृतदेह लोंबकळताना आढळले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.