आगरवाड्यातील जुगाराचे अड्डे बंद न केल्यास मोर्चाचा इशारा

0
110

न्यथा पोलीस स्टेशनवर मोर्चा नेण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. आगरवाडा येथे मुख्य रस्ता व लोकवस्तीतच गेले ६ महिने जुगाराचे अड्डे बिनधास्त चालत असून ते बंद झाले नाहीत तर नागरिकांना रस्त्यावर येवून ते बंद करावे लागतील. त्यासाठी नागरिकांची बैठक होवून निर्णय घेतला आहे.

बंदिस्त खोलीत असलेला जुगार मोकळ्या जागी भरवला जात असून त्यामागे सरकारी कर्मचारी व राजकीय पक्षाच्या समर्थकांचा सहभाग असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. हिंमत असेल तर जुगार बंद करून दाखवा अशा धमक्या जुगार व्यावसायिकांकडून दिल्या जात आहेत.
पोलीस निरीक्षकांसमोर आव्हान
पेडणे तालुक्यात जुगाराची चर्चा जागोजागी होत आहे. तालुक्यात कोणत्या ठिकाणी किती व कुणाचे अड्डे चालतात ते कोण चालवतो, याची पूर्ण माहिती स्थानिक पंचायत, सदस्य, पोलीस व अधिकार्‍यांना असते अशीही चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार हरमल येथील एक जुगाराचा अड्डा प्रतिष्ठित व्यक्ती चालवत आहे. मागच्या ङ्गेब्रुवारीत या जुगारावर कडक कारवाई करण्याचा इशारा तत्कालीन पोलीस निरीक्षक देवेंद्र गाड यांनी दिला होता. मात्र जुगारवाल्याने थेट पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता व बदली करण्यापर्यंत मजल गेली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक देवेंद्र गाड हे ३१ मार्च २०१६ रोजी निवृत्त झाले.बंदिस्त जुगार आता दिवस रात्र खेळवल्या जाणार्‍या क्रिकेट स्पर्धां वेळीही कार्यरत झाले आहेत.