आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास ऍडमिन जबाबदार नाही

0
10

सोशल मीडियावर मेसेजिंग ऍप व्हॉट्सऍपवर अनेकदा ग्रुपवरील मेसेजवरून वाद होतात. त्यानंतर या मेसेजसाठी ग्रुप ऍडमिनला जबाबदार धरले जाते. पोलिसांकडूनही अनेकदा ग्रुप ऍडमिन जबाबदार असेल अशा प्रकारच्या सूचना दिल्या जातात. मात्र, केरळ हायकोर्टाने या प्रकरणात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय दिला आहे. त्यानुसार व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये इतर सदस्यांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास त्याला ऍडमिनला जबाबदार धरता येणार नाही, असा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला. कोणत्याही ऍडमिनकडे मेसेज पुढे पाठवण्यासाठी येत नाही किंवा तो पाठवत नाही. ग्रुपचे सदस्य आणि ऍडमिन यांच्यात तसा संबंध नाही. त्यामुळे ग्रुपमधील इतर सदस्यांच्या मेसेजसाठी ऍडमिनला जबाबदार धरणे गुन्हेगारी कायद्याच्या मुलभूत सिद्धांताच्या विरोधात आहे, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले.