केंद्राच्या सामाजिक सबलीकरण योजनेखाली केंद्र सरकार गोव्याला राज्यात आंबेडकर भवन, वृद्धाश्रम, व्यसनमुक्ती केंद्रे आदी उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती काल केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची त्यांनी भेट घेतली. प्रस्तावित आंबेडकर भवन हे पेन्ह-द-फ्रान्स येथील चार हजार चौ. मी. एवढ्या जागेत उभारण्यात येणार आहे. दरम्यान, नवबौद्धांना अनुसूचित जातींतील लोकांसाठी असलेल्या आरक्षणाचा गोव्यात लाभ मिळावा यासाठीही प्रयत्न चालू असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.