अविश्वास ठरावावर 8 ऑगस्टपासून

0
5

>> 10 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी देणार उत्तर

विरोधी पक्षांकडून मोदी सरकारविरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वासाच्या ठरावावर पुढील आठवड्यात संसदेत चर्चा होणार आहे. पुढील आठवड्यातील 8 ऑगस्ट रोजी प्रश्नोत्तराच्या सत्रानंतर चर्चेला सुरुवात होणार असून, ती 9 ऑगस्ट रोजी देखील चालेल. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत विरोधकांना उत्तर देणार आहेत. विरोधी पक्षाने मणिपूरच्या मुद्द्यावर अविश्वास प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील मंजुरी दिली होती.

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी मणिपूरच्या मु्‌‍द्द्यावर सरकारला घेरले आहे. याच मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संसदेत घमासान सुरू आहे. या मुद्द्यावर सरकार आणि विरोधक दोन्हीही चर्चा करण्यास तयार आहेत. सरकारकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या मुद्द्यावर बोलणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले; मात्र विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच संसदेत येऊन या मुद्द्यावर भाष्य करावे, अशी मागणी लावून धरली आहे. या आता पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ऑगस्ट रोजी संसदेत येऊन या मुद्द्यावर भाष्य करणार आहेत. विरोधकांकडून मांडण्यात आलेला अविश्वास प्रस्तावाचे संसदेत काय पडसाद उमटणार हे देखील पाहणे गरजेचे आहे. आता संसदेत या मुद्द्यावर होणाऱ्या चर्चेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागू राहिले आहे.