अवकाळी पावसाने राज्याला झोडपले

0
232

राजधानी पणजीसह राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाने काल झोडपून काढले. शिरोडा आणि केपे येथे गारांचा पाऊस पडला.
हवामान बदलामुळे गुरूवारी राज्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. शुक्रवारी जास्त प्रमाणात अवकाळी पाऊस कोसळला आहे. केपे, शिरोडा येेथे गारांचा पाऊस पडला. तर, मडगाव, कुडचडे, काणकोण, फोंडा, पणजी व इतर भागात जोरदार सरी कोसळल्या. या अवकाळी पावसामुळे दुचाकी वाहन चालकांची तारांबळ उडाली.