अल्पवयीन नातीचा विनयभंग; तक्रार दाखल

0
27

फोंडा तालुक्यात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली असून, आजोबांनीच आपल्या अल्पवयीन नातीचा विनयभंग केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. या प्रकरणी फोंडा पोलीस स्थानकात पीडित मुलीच्या पालकांनी तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणी फोंडा पोलीस तपास करीत आहेत. राज्यात सध्या मुलींच्या विनयभंगाच्या तक्रारी वाढत आहेत. फोंडा तालुक्यातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंगाच्या प्रकरणानंतर दक्षिण गोव्यात एक विद्यालयात विद्यार्थिनीच्या विनयभंगाचे प्रकरण उजेडात आले होते.