अलाहाबाद विद्यापीठात हिंसाचार अन् जाळपोळ

0
8

प्रयागराजमधील अलाहाबाद विद्यापीठात सोमवारी मोठा गोंधळ झाला. विद्यार्थी आणि सुरक्षारक्षकांमध्ये झालेल्या जोरदार दगडफेकीत डझनभर विद्यार्थी जखमी झाले. यावेळी सुरक्षारक्षकांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार केल्याचा आरोपही विद्यार्थ्यांकडून करण्यात आला.

विद्यार्थी संघटनेच्या पुनर्स्थापनेबाबत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते, त्यावेळी विद्यार्थी आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची झाली. विटा, दगड फेकण्यापर्यंत वाद वाढला अन् संतापलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ कॅम्पसमध्ये तोडफोड करण्यासोबतच काही वाहने पेटवून दिली. विद्यार्थ्यांनी सुरक्षारक्षकांवर गोळीबार केल्याचा आरोप करत विद्यापीठ परिसरात उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या.