अर्थशास्त्राचा नोबेल तीन शास्त्रज्ञांना जाहीर

0
3

अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. विजेत्यांमध्ये तुर्की-अमेरिकन डॅरेन एसेमोग्लू, ब्रिटिश-अमेरिकन सायमन जॉन्सन आणि ब्रिटिश जेम्स ए. रॉबिन्सन यांचा समावेश आहे. विविध राजकीय संस्थांची निर्मिती आणि त्याचा समाजाच्या प्रगतीवर होणारा परिणाम याविषयी केलेल्या संशोधनासाठी त्यांना हा सन्मान मिळाला आहे. या तिन्ही अर्थतज्ज्ञांनी वर्षानुवर्षे प्रगती करूनही गरीब देशांचा श्रीमंत देशांसारखा विकास कसा होऊ शकला नाही, हे सांगितले आहे.