अर्णव गोस्वामींना आत्महत्या प्रकरणावरून मुंबईत अटक

0
259

टीआरपी घोटाळ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या आईच्या आत्महत्या प्रकरणात गोस्वामी यांना ताब्यात घेण्यात आले. अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या स्टुडिओच्या इंटेरियर डिझाईनचे काम केले होते. त्यासाठी त्यांना अर्णब यांच्याकडून ५ कोटी ४० लाख रुपये येणे होते. परंतु वारंवार बिल मागूनही गोस्वामी यांच्याकडून पैसे दिले जात नव्हते. त्यामुळे मानसिक तणावाखाली येऊन अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या आईने देखील आत्महत्या केली. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी केलेल्या तक्रारीनंतर अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली.