काणकोण तालुक्यात ३ कंटेनमेंट झोन जाहीर

0
61

काणकोण तालुक्यात काल ८ रोजी एकाच दिवसात विविध ठिकाणी मिळून १६ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. दरम्यान, एकेका घरात ५ पेक्षा अधिक रूग्ण आढळल्यामुळे वेलवाडा – पैंगीण, पारवे – आगोंदा आणि नगरपालिका क्षेत्रातील पणसुले भाग मिळून तीन ठिकाणी मायक्रो कन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत.

दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी रूचिका कटयाळ यांनी वरील आदेश जारी केला आहे. वरील तिन्ही ठिकाणी काणकोणचे पोलीस, आरोग्य केंद्र तसेच तालुका मामलेदार तसेच उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून कडक लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या तिन्ही ठिकाणच्या कोविड रूग्णांना आवश्यक असलेली मदत करण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या जे रूग्ण आढळले आहेत त्यात वेलवाडा – पैंगीण ५, पारवे – आगोंदा ५ व पणसुले येथील ६ रूग्णांचा समावेश आहे.