अरविंद केजरीवाल यांच्याकडून गोव्यातील जनतेची दिशाभूल

0
95

>> प्रदेश भाजपचा आरोप

>> जाहीर चर्चेचे आव्हान

आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील जनतेची दिशाभूल करण्याचा सपाटा लावला असून
गोमंतकीय जनतेने त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन प्रदेश भाजप प्रवक्ते डॉ. प्रमोद सावंत व नीलेश काब्राल यांनी काल पत्रकार परिषदेत केले.
केजरीवाल यांनी गोवा सरकारचे प्रशासन व दिल्लीचे प्रशासन या विषयावर एका व्यासपीठावर चर्चा करण्यास पुढे यावे, असे आव्हान सावंत व काब्राल यांनी त्यांना दिले आहे. दिल्लीतील त्यांच्या सरकारातील २१ आमदारांवर घोटाळ्यांचे आरोप आहेत. तर काही आमदार तुरुंगातही आहेत. अशा पक्षाच्या नेत्यांना गोव्यातील जनतसमोर खोटी माहिती देण्याचा नैतिक अधिकार नाही, असे सावंत यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात दिल्लीतील जनतेला दिलेल्या जाहीरनाम्यातील दहा टक्केसुद्धा आश्‍वासनांची त्यांनी पूर्तता केलेली नाही, असा आरोपही सावंत यांनी केला. मागास जमाती, मागास जाती यांच्या कल्याणासाठी भाजपने जे कार्य केले आहे, ते अन्य कोणत्याही पक्षाने केलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.