अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली

0
9

अरविंद केजरीवालांच्या सीबीआय अटकेला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने काल फेटाळली. तसेच जामीन अर्जासाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्यास सांगितले आहे. 29 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. सीबीआयने 26 जून रोजी त्यांना अटक केली होती. त्याआधी ईडीने 21 मार्च रोजी त्यांना अटक केली होती. मात्र, 12 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. मात्र सीबीआय प्रकरणामुळे ते अजूनही तुरुंगात आहेत.