दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात ईडीने जारी केलेले समन्स केजरीवाल यांनी पाचवेळा धुडकावले. त्यामुळे ईडीने न्यायालयात दाखल झाली आहे. तर इडीने न्यायालयात धाव घेतल्यानंतर केजरीवाल यांनी भाजपने पक्षात येण्याची ऑफर दिली असल्याचे म्हटले आहे. भाजपचे माठे षडयंत्र रचत आहे पण ते अपयशी ठरणार असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. मला भाजपने ऑफर दिली पण मी त्यांना नकार दिला असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. ईडीने अबकारी धोरणातील कथित घोटाळ्यासंदर्भात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी, पाच वेळा समन्स बजावूनही केजरीवाल यांच्या पालन न केल्याबद्दल ईडीने न्यायालयात धाव घेतली आहे.