अयोध्या प्रकरणी १८ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण व्हावी ः सरन्यायाधीश

0
125

अयोध्या प्रकरणी १८ ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद आणि सुनावणी पूर्ण व्हायला हवी, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले. या प्रकरणी मध्यस्थीच्या प्रयत्नांसाठी सुनावणी रोखता येणार नाही. सुनावणीसह मध्यस्थीचे प्रयत्न सुरू ठेवता येऊ शकतात, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

देशातील राजकीय आणि सामाजिक दृष्टीने संवेदनशील असलेल्या अयोध्या प्रकरणाचा निकाल नोव्हेंबरमध्ये लागू शकतो, असे मानले जात आहे. सरन्यायाधीश गोगोई १७ नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्याआधी या प्रकरणी निकालाची शक्यता आहे. या प्रकरणी दरदिवशी होणार्‍या सुनावणीचा कालावधी एक तास वाढवण्यास आणि शनिवारीही सुनावणी घेण्यात यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सूचवले आहे.
२७ सप्टेंबरपर्यंत बाजू मांडली जाईल, असे मुस्लिम पक्षकारांकडून सांगण्यात आले. तर युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील असे हिंदू पक्षकारांनी सांगितले.