टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेवर मात

0
114
>> विराट कोहलीची विक्रमी नाबाद खेळी
कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमी खेळीच्या जोरावर भारताने दुसर्‍या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ गड्यांनी पराभव तीन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिली लढत पावसामुळे रद्द झाली होती. कर्णधार विराट कोहलीची सामनावीर पुरस्कारासाठी निवड झाली.
दक्षिण आफ्रिका संघाकडून मिळालेले १५० धावांचे विजयी लक्ष्य भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात १९व्या षट्‌कांत गाठले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा केवळ १२ धावा काढून परतला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या कर्णधार विराट कोहलीने संघाचा डाव सावरताना दुसर्‍या विकेटसाठी शिखर धवनच्या साथीत ६१ धावांची भागीदारी केली. धवन ४० धावा जोडून बाद झाला. युवा ऋषभ पंत पुन्हा अपयशी ठरला. त्याला केवळ ४ धावांचे योगदान देता आले. शेवटी कोहलीने श्रेयस अय्यरच्या साथीत आणखी गडी बाद होऊ न देता भारताचा विजय साकारला. कोहली ४ चौकार व ३ षट्‌कारांनिशी ५२ चेंडूत ७२ धावा करून नाबाद राहिला. श्रेयस अय्यने १६ धावांची नाबाद खेळी केली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकन संघाने ५ गडी गमावत १४९ अशी धावसंख्या उभारली होती. कर्णधार क्विंटन डी कॉकने ८ चौकारांच्या सहाय्याने ३७ चेंडूत सर्वाधिक ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. तंंेंबा बाउमाने ४९ धावा जोडल्या. डेव्हिड मिलरने १८ तर ड्‌वेन प्रिटोरियसने १० धावांचे योगदान दिले. भारताकडून दीपक चहरने २ तर नवदीप सैनी, रवींद्र जडेजा व हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
धावफलक
दक्षिण आफ्रिका ः रिझा हेंड्रिक्स झे. वॉशिंग्टन सुंदर गो. दीपक चहर ६, क्विंटन डी कॉक झे. विराट कोहली गो. नवदीप सैनी ५२, तेंबा बाउमा ४९, रॅसी वॅन दर दुसेन झे. व  गो. रवींद्र जडेजा १,  डेव्हिड मिलर त्रिफळाचित गो. हार्दिक पंड्या १८, ड्वेन प्रिटोरियस नाबाद १०, अँडिले फेहलुक्वायो नाबाद ८.
अवांतर ः ५. एकूण २० षट्‌कांत ५ बाद १४९ धावा.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-३१ (रिझा हेंड्रिक्स ३.५), २-८८ (क्विंटन डी कॉक ११.२), ३-९० (रॅसी वॅन दर दुसेन १२.१), ४-१२६ (तेंबा बाउमा १७.१), १२९-५ (डेव्हिड मिलर १८.१)
गोलंदाजी ः वॉशिंग्टन सुंदर ३/०/१९/०, दीपक चहर ४/०/२२/२, नवदीप सैनी ४/०/३४/१, रविंद्र जडेजा ४/०/३१/१, हार्दिक पंड्या ४/०/३१/१, कृणाल पंड्या १/०/७/०.
भारत ः रोहित शर्मा पायचित गो. अँडिले फेहलुक्वायो १२, शिखर धवन झे. डेव्हिड मिलर गो. तबरेझ शम्सी ४०, विराट कोहली नाबाद ७२, ऋषभ पंत झे. तबरेझ शम्सी गो. बिजॉर्न फॉर्चुइन ४, श्रेयस अय्यर नाबाद १६.
अवांतर ः ७. एकूण १९ षट्‌कांत ३ बाद १५१.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-३३ (रोहित शर्मा ३.५), २-९४ (शिखर धवन ११.४), ३-१०४ (ऋषभ पंत १३.४)
गोलंदाजी ः कागिसो रबाडा ३/०/२४/०, ऍनरिच नॉर्तजे ३/०/२७/०, अँडिले फेहलुक्वायो ३/०/२०/१, ड्वेन प्रिटोरियस ३/०/२७/०, तबरेझ शम्सी ३/०/१९/१, बिजॉर्न फॉर्चुइन ४/०/३२/१.
विराटचा आणखी एक पराक्रम
टीम इंडियाचा युवा आक्रमक कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० सामन्यात नाबाद ७२ धावांची अर्धशतकी खेळी करत आणखी विक्रम आपल्या नावे केला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा काढणारा फलंदाज ठरला आहे. त्याने त्याचाच संघसाथी सहकारी रोहित शर्माला मागे टाकले आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारे फलंदाज पुढीलप्रमाणे ः
१) विराट कोहली – २४४१ धावा.
२) रोहित शर्मा  – २४३४ धावा.
३) मार्टीन गप्टील – २२८३ धावा.
४) शोएब मलिक – २२६३ धावा.
५) ब्रँडन मॅक्कुलम  २१४० धावा.